LIVE : लोक कल्याणकारी योजना बंद करून तो पैसा मोदी त्यांच्या मित्रांना देणार आहे-कन्हैय्याकुमार

Foto

औरंगाबाद- 'संविधान बचाओ देश बचाओ'  जाहिरसभेत  प्रमुख मार्गदर्शक कन्हैय्याकुमार यांच्या भाषणाला सुरुवात झाली आहे.



कन्हैय्याकुमार यांच्या भाषणातील मुद्दे

 

8.06pm- औरंगाबाद मध्ये दिल्ली गेट आणि रंगीन गेट मी पाहिले. मी दिल्लीहून आलो.  तिथेही एक दिल्ली गेट आणि एक रंगिन प्रधानमंत्री आहेत.



8.14pm- मंदिराचा मुद्दा 1992 पासूनचा आहे. या मुद्द्यावर भाजप दोनवेळा  सत्तेवर  आली आहे. आता पुन्हा एकदा मंदिर प्रश्न निर्माण होऊ लागला आहे. हे आता आपण समजून घेतले पाहिजेत.



08.17pm-  २०१४ च्या निवडणुकीत जी आश्वासने मोदींनी दिली होती त्याचा एकदाही मन की बात मध्ये उल्लेख केला नाही.  ते मराठवाडय़ातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना भेटायला येत नाही. तर ते प्रियंका चोप्रा आणि अनुष्काच्या रिसेप्शनला जातात.



08.28pm- लोक कल्याणकारी योजना बंद करून तो पैसा मोदी त्यांच्या मित्रांना देणार आहे.

 

08.30pm- मंदिर बांधण्यासाठी मशिद तोडली नव्हती. तर सरकार बनवण्यासाठी मशिद तोडण्यात आली होती.

 

08.31pm- हे रामाचे भक्त नाही नथुरामचे भक्त आहेत.

 

08.33pm- 2014 मधील मोदींचा विकास साडेचार वर्षात कुठेच दिसला नाही. आता तो विकास झोला घेऊन मंदिराकडे निघाला आहे.


08.35pm- ना हिंदू खतरे में है ना मुसलमान खतरे में है , देश का नौजवान, किसान और संविधान खतरे में है.